Skip to main content

Posts

Featured

"जयभीम"

 "जयभीम" न्याय व्यवस्थेची मशाल तेवतो जयभीम तुझ्या अन्यायाची कडी तोडतो जयभीम कोण आहेत हे? विचारा सेवाकऱ्यांनो विषमतेची चामडी सोलतो जयभीम सत्तेच्या लालसेचा फसवा हा जयघोष सत्य जागणारा सिंहगर्जतो जयभीम कचेऱ्या झाल्या सुन्न, बसल्या खिन्न पेनाच्या क्रांतीचा एल्गार ठोकतो जयभीम हिनवू नको, तू एक हो माणसा.. माणसाची माणूस जात सांगतो जयभीम दुबळ्या-खंगल्यांना सर चढावं लागेल.. अशी अब्जसूर्य उर्जा जाळतो जयभीम स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता ही.. मूल्य जागतो जयभीम.. बोलतो जयभीम ✒️_____ डेनिस वासनिक (द्वरकाई)

Latest Posts

नाते तुझे जपावे! आता कठीण आहे..